दिव्यमराठीचे फूड फेस्टिव्हल अन सोलापुरी खवय्येगिरी

प्रत्येक शहराची-गावाची ओळख ही तिथल्या ऐतिहासिक-सांस्कृतिक परंपरा बरोबरच तिथल्या खाद्य संस्कृतीमुळे लक्षात राहणारी असते. एखाद्या गावाला किंवा शहराला यापैकी कुठलाच वारसा नाही असे गाव किंवा शहर या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. भाषा-धर्म-प्रांत हे भलेही माणसा-माणसांमध्ये दुफळीचे निमित्त ठरत असतील. मात्र तिथली खाद्य संस्कृती ही माणसा-माणसांमध्ये एकोपा निर्माण करणारी असते. बहुविध भाषा आणि एकापेक्षा जास्त धर्म एखाद्या शहरात किंवा गावात एकोप्याने नांदत असतील तर खुशाल समजावे की तिथली खाद्यसंस्कृती ही निश्चितच सरस अशीच आहे. आंध्रप्रदेश-कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेले महाराष्ट्र राज्यातील सोलापूरशहर हे देखील आपल्या खास सोलापुरी खाद्यसंस्कृतीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारे शहर म्हणून आपली खासियत बाळगून आहे. जगभरात तिसऱ्या क्रमांकावर तर देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या भास्कर माध्यम समूहाच्या दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीतर्फे दरवर्षी सोलापुरी खाद्यसंस्कृतीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने आणि खाद्य व्यवसायातील होतकरू नव व्यावसायिकांना ब्रॅण्डिंग साठी वाव मिळावा तसेच खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून सोलापूर शहरात फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते.

‘भास्कर’ समूह देशभर फक्त वृत्तपत्राचा व्यवसाय करीत नाही. तर ‘ जैसा देस वैसा भेस ‘ या उक्तीप्रमाणे त्या – त्या शहरातील परंपरा – संस्कृतीला बढावा देत तिथल्या विकासात्मक उभारणीसाठी आपले रचनात्मक योगदान देखील देत असतो. सोलापुरात अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत भास्कर समूहाच्या दिव्यमराठी या मराठी वृत्तपत्राच्या समूहाने सोलापुरी संस्कृती आणि सोलापुरी भाषेला प्राधान्य देण्याची नेहमीच भूमिका आग्रहाने मांडली आहे. दहा वर्षात कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजेच २०२० मध्ये नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत नियोजित फूड फेस्टिव्हल रद्द केले होते. तर २०२१ मध्ये सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत व्हर्च्युअल फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. म्हणजेच या दहा वर्षांच्या काळात फक्त एकदाच फूड फेस्टिव्हलचे आयोजन आपत्कालीन परिस्थितीमुळे रद्द करण्यात आले होते. फूड फेस्टिव्हलचे यंदाचे नववे वर्ष आहे.

सोलापुरी चवीचे आकर्षण असणाऱ्या हजारों खवय्यांसाठी वर्षभर वाट पहायला लावणाऱ्या यंदाच्या दिव्यमराठी फूड फेस्टिव्हलचे दि. २९ डिसेंबर २२ ते १ जानेवारी २०२३ असे एकूण चार दिवसांचे आयोजन करण्यात आले. रोज सायंकाळी ४ ते रात्रौ १० वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या फूड फेस्टव्हलला सोलापूर शहरासह लगतच्या जिल्ह्यातील तसेच कर्नाटक-आंध्रप्रदेशाच्या सीमावर्ती भागातील खवय्यांनी भेट देत सोलापुरी खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारला. २९ डिसेंबरच्या सायंकाळी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, उद्योगपती आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया आणि दिव्यमराठी, सोलापूरचे युनिट हेड नौशाद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगारंग कार्यक्रमाद्वारे फूड फेस्टिव्हलचे शानदार उदघाटन करण्यात आले. प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन विभागात खाद्यपदार्थांच्या घमघमाटाने परिसर गंधित झालेला अनुभवायला मिळत होता. सरत्या वर्षाला निरोप देताना म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री तर स्पाईस अँड आईस या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक आणि मॅनेजमेंट गुरू अनीश सहस्त्रबुद्धे यांच्या गेम शो आणि निवेदनाने खवय्यांची भूक वाढविली.

:- मुकुंद मधुकर हिंगणे, सोलापूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

5

)

 1. kekaderajesh

  अतिशय सुंदर वर्णन

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद राजेश 🙏🙏

   Like

 2. Vijay Pawar

  सोलापूरकरानी अगदी प्रचंड प्रतिसाद दिला मला अस वाटतं की आपलाही हातभार या मध्यामधून लागला गेला विजय पवार सोलापूर

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   विजयजी, शहरवासीयांचा दिव्यमराठी वर असणारा विश्वास यातून दिसून आला. दिव्यमराठीच्या प्रत्येक उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे. यात ‘मी’ ऐवजी ‘आपण’ हा संघटित शब्द महत्वाचा ठरतो. 🙏🙏🙏

   Like

 3. smitahingne

  👌👍

  Liked by 1 person

%d bloggers like this: