About me

स्वच्छंदी, मनमुराद अन् भ्रमंती युक्त जगण्याला आयुष्य म्हणावं या विचाराचा असल्याने सुरुवातीपासूनच ध्येय निश्चित करून आखीव-रेखीव आयुष्य जगण्याचा कधीच प्रयत्न न केलेला मी लेखनप्रवासी कसा झालो हे मलाच कळले नाही. काहीच जमत नाही म्हणून अपघाताने पत्रकारितेच्या क्षेत्रात आलो अन् लिहीत गेलो….घडत गेलो. पत्रकार हुद्द्याची विविध वृत्तपत्रातील नोकरी जवळपास पंचवीस वर्षे केल्यानंतर जरा विश्रांती म्हणून नोकरीच्या बंधनातून स्वतः ला मुक्त केले. आता मुक्तपत्रकारीता सुरू आहे. बदलत्या जगाशी मैत्री करायची म्हणून तर यावाटेवर आलोय. ब्लॉग हे व्यासपीठ सर्वव्यापी आहे. त्यामुळेच ते अमर्याद आहे. आभासी जगाचा तो समुद्र आहे. या समुद्राच्या लाटेवर स्वार झालेला मी एक नाविक…..आता रोज भेटत राहू…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

%d bloggers like this: