घरगुती चवीचाच ‘फराळ’ हवा ! मग ‘रानवेध’ आहे ना तुमच्या मदतीला……!

भारतीयांमध्ये सर्वात उत्साहाने साजरे होणारे प्रामुख्याने दोनच उत्सवी सण समजले जातात. एक म्हणजे गणपती बाप्पांचा ‘गणेशोत्सव’ आणि दुसरा प्रकाशाचा दीपोत्सव म्हणजेच ‘दिवाळी’. भारतीय म्हणजे मग धर्म कुठलाही असुद्यात. या दोन प्रमुख उत्सवी सणा मध्ये प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा सहभाग हा असतोच. त्यामुळेच हे दोन्हीही सण खऱ्या अर्थाने सर्वधर्मीयांचे. दिवाळी आता अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. घराची रंगरंगोटी, सणासाठी नवे कपडे खरेदी, रोषणाईची तयारी याची लगबग सुरू झाली आहे. त्याबरोबरच खरी कसोटी असते ती महिलावर्गाची. सणाची खरी ‘लज्जत’ वाढते ती दिवाळीसाठी केलेल्या फराळामुळेच. दिवाळीला परिधान केलेले नवे कपडे, रोषणाई, दारात काढलेली रांगोळी, जमा झालेले पै-पाहुणे, फटाक्यांची आतषबाजी ही तर आनंदोत्सवाची पार्श्वभूमी झाली. अभ्यंगस्नानानंतर पुढ्यात आलेला ‘फराळ’ जर चवदार नसेल, काटेरी चकली जर बिघडली तर दिवाळीची सारी ‘रंगतच’ बिघडते. त्यामुळे महिलावर्गाचं सगळ्यात टेन्शनचं काम म्हणजे दिवाळीचा ‘फराळ’ कसा बनवायचा ? सगळ्यांचाच हात अगदी सुगरणीचा असतो असं थोडंच आहे. त्यात पुन्हा दिवसभर घरातली नियमित कामे उरकून ‘फराळाचा’ घाट घालायचा…..त्यात नोकरी करणाऱ्या महिला असतील तर आणखीनच अवघड. बरं दिवाळीच्या फराळातील जवळपास सर्वच पदार्थ एरवी देखील अगदी बारा महिने विकत मिळतात. मग एव्हढं ‘टेन्शन’ का घ्यायचं ? हीच तर खरी गंमत आहे. हॉटेल किंवा हलवाईच्या दुकानात मिळत असले तरी त्या पदार्थांना घरची चव थोडीच असते. म्हणून तर ज्यांना फराळ बनवणे जमत नसेल किंवा फराळ बनवायला उसंतच नसेल अश्यांना हवा असतो घरगुती चवीचा दिवाळीचा फराळ. तसे प्रत्येक गावात, शहरात घरगुती चवीचा दिवाळीचा फराळ तयार करणारे स्वयंपाकी, केटरर्स, महिलांचे गट कार्यरत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने उपजीविकेसाठी अर्थार्जन करून देणारा हा व्यवसाय सगळीकडेच दिसतो. पण त्यातही पदार्थांची गुणवत्ता, चव आणि दर याची उत्तम सांगड घातलेले या व्यवसायात नाव कमावतात.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप सारख्या गावातील शेतात राबणाऱ्या महिलांच्या रानवेध बचतगटाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून घरगुती चवीचा गुणवत्तापूर्ण असा दिवाळी फराळ माफक दरात उपलब्ध करून देणाऱ्या मंद्रुप येथील अनिल विठ्ठल कामतकर यांच्याविषयी थोडेसे….१९८३-८४ च्या सुमारास ‘वाढपी’ म्हणून उपजीविकेचे काम सुरू करणाऱ्या अनिल कामतकर यांनी आपल्या अंगीभूत मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर प्रमुख आचाऱ्याचा मदतनीस झाल्यावर पुढे १९८९ पासून स्वतंत्रपणे नीलिमा केटरर्स म्हणून आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला.

केटरर्स म्हणून शहर-ग्रामीण भागात आपला व्यवसाय करीत नावलौकिक प्राप्त केला. त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मंद्रुप येथील रानवेध महिला बचतगटाच्या माध्यमातून चविष्ट अशा दिवाळी पदार्थांची निर्मिती सुरू केली. यामाध्यमातून रानवेध महिला बचतगटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला. या कामात अनिल कामतकर, त्यांच्या पत्नी सौ. अनिता कामतकर आणि स्नुषा सौ. केतकी विनोद कामतकर असं संपूर्ण कुटुंबच कार्यमग्न असतं. यात कच्चामाल आणणे, पदार्थ तयार करणे, मालाचे पॅकिंग, पार्सल या अंगमेहनतीच्या कामाचा समावेश असतो. कारण हे पदार्थ मशिनद्वारे नाही तर हाताने केले जातात. मागणीनुसार पुरवठा करताना उत्पादनाचे गणित हे केवळ सराव आणि अंगमेहनतीवर अवलंबून असते. अर्थात श्रमाचा गंध हा पदार्थाची चव वाढवितो. म्हणूनच अनिल कामतकर यांच्या रानवेध दिवाळी फराळाला ग्राहकांकडून मागणी असते.

कामतकर यांच्या रानवेध दिवाळी फराळाला फक्त सोलापूर शहर-जिल्ह्यातच नाही तर परदेशातूनही मागणी असते. अगदी परवाच तयार पदार्थांचा पहिला लॉट पार्सलने अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. अतिशय माफक दरात उपलब्ध असणाऱ्या रानवेध दिवाळी फराळाच्या पॅकेजमध्ये खारीबुंदी, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू, शंकरपाळे, चकली, पोह्याचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, खमंग शेव अशा चटकदार आणि लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. अगदी घरगुती चवीचा हा फराळ असल्याने महिला वर्गाकडून कामतकरांच्या रानवेध दिवाळी फराळाच्या पॅकेजची मागणी वाढत चालली आहे. वेळेत आपल्या घरी रानवेधचा दिवाळी फराळ यावा याकरिता 9850434353 या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे आपली ऑर्डर आजच नोंदवा असे आवाहन कामतकर यांनी केले आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to Rakesh Narwani उत्तर रद्द करा.

Comments (

22

)

  1. Ranvedh update

    व्वा, खूप सुंदर लिहल आहे, प्रत्येक शब्दांत दिवाळीच्या आनंदाची अनुभूती येते.
    यंत्रावर तयार होणाऱ्या पदार्थापेक्षा स्वतः घरीच तयार केलेल्या व त्या कामाची
    अनुभव, हातची चव असणाऱ्यानी केलेले पदार्थ चवदार असतात, हा उल्लेख यथार्थ आहे.
    ग्रामीण भागातील शेतशिवारात काम करणाऱ्या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी
    रानवेध महिला बचत गटाचा उपक्रमची दखल घेऊन प्रोत्साहन दिलं.
    ‘श्रमनिष्ठा हीच प्रतिष्ठा’ हे ब्रीद घेऊन नीलिमा केटरर्स कार्यरत आहे. अनिल
    कामतकर यांचा संघर्ष व त्याची श्रमनिष्ठा खूप छान शब्दांत मांडली.
    मनःपूर्वक धन्यवाद..
    सर्वांनी नीलिमा केटरर्स व रानवेध महिला बचत गट यांच्या फराळाचे पदार्थ घेऊन
    प्रोत्साहन द्यावे, ही विनंती.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      मी फक्त प्रवास शब्दबद्ध केलाय एव्हढेच. पण रानवेध महिला बचत गटाचे कार्य आणि कामतकर कुटुंबाचे त्यामागचे कष्ट हेच फराळाच्या प्रत्येक पदार्थाची चव आणि लज्जत बनले आहेत. 🙏🙏

      Liked by 1 person

  2. rahul kokane

    खूप छान लिहिलंय सर. मी अवश्य खरेदी करणार.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      आपण सगळ्यांनीच यावेळी रानवेधचा दिवाळीचा फराळ घ्यायचा.👍👍

      Liked by 1 person

  3. ni3kav

    खूप छान, सुरेख लिखाण,
    happy diwali 💐🎉🎁

    Liked by 1 person

  4. मुकुंद हिंगणे

    मित्र हो, https://avatibhavati.in या माझ्या मराठी भाषेतील ब्लॉगला follow करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे.
    पहिल्यांदा आपण गुगल क्रोम वर जाऊन https://avatibhavati.in टाईप करावे. स्क्रीनवर माझ्या ब्लॉगचे मुखपृष्ठ दिसते. त्या खालोखाल आर्टिकल दिसते. आर्टिकलच्या हेडिंग वर डबल क्लिक केल्यावर स्क्रीनवरील मॅटर खालीवर केल्यानंतर उजव्या बाजूला तळाशी follow अशी अक्षरे उमटतात. त्यावर क्लिक केले असता आपल्या इमेल अड्रेसची मागणी केली जाते. आपण आपला इमेल आयडी नोंदविल्यानंतर दुसऱ्या क्षणाला आपल्या मेल बॉक्समध्ये ब्लॉगचा कन्फर्मेशनचा मेल येतो. या मेलला कन्फर्म केले की आपण ब्लॉगचे फॉलोवर होता. नवीन आर्टिकल प्रसिद्ध झाले की लगेचच आपल्याला मेल येतो. त्यावर आर्टिकल वाचून आपण मेलवरच रिप्लाय मधून कमेंट करू शकता. जी थेट ब्लॉगवर उमटते.
    चांगल्या वाचनासाठी आपण https://avatibhavati.in या ब्लॉगला follow करावे.
    :- मुकुंद हिंगणे.

    Liked by 1 person

  5. rituved

    खरंय दिवाळी म्हणलं की पहिला आठवत ते फराळाचा ना 😋😋

    Liked by 1 person

  6. Ramdas Katkar

    छान वर्णन केले आहे

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      रामदासजी आपण पण दिवाळीचा फराळ तयार करता. गडबडीत हा उल्लेख करायचा राहूनच गेला. पण यामागचे श्रम आपल्याही अंगवळणी आहेत. त्या श्रमाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावे म्हणून हा लेखन प्रपंच..! 🙏🙏

      Liked by 1 person

  7. anjali jangale

    खुप छान अक्षरजुळवणी केली आहे… कुणाचाही असो प्रवास वर्णन करतानी चांगलाच कसं लागतो… परंतु तुम्ही खुप सोप्या भाषेत लेखन करता. शुभ दीपावली

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      अगदी खरंय तुझं अनु…🙏🙏

      Liked by 1 person

      1. anjali jangale

        धन्यवाद सरजी

        Liked by 1 person

  8. KK

    खुप छान वर्णन आहे 👌👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद केकेजी 🙏🙏🙏

      Liked by 1 person

  9. Rupali

    Lekh chhanch aahe pan ti ladvachi plate matra apratim diste 😀. Tumchya ghari faralachi lagbag suru aahe ki nahi?

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      हो मग, आठ दिवस आधीच लागणारे साहित्य आणि किराणा सामान आणावा लागतो. तरी सध्या आमच्याकडे पाऊस सुरू आहे. त्यामुळे पदार्थ बिघडण्याचा धोका अधिक असतो.☺️☺️ तुम्ही नॉर्वेत दिवाळी साजरी करता ना….इथल्या सारखी. 😍😍

      Liked by 1 person

      1. Rupali

        😁 next week amhi tighe teen thikani busy asu. Pan nidan shanivar ani ravivar Diwali cha anand ghevu. Sagale jenvha asti ghara tochi diwali dasara.

        Liked by 1 person

      2. मुकुंद हिंगणे

        हे मात्र एकदम खरं, सगळे घरी असायला हवेत.

        Liked by 1 person

  10. Rakesh Narwani

    Very nice

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद राकेशजी 🙏🙏🙏

      Liked by 1 person

  11. smitahingne

    👌

    Liked by 1 person

  12. मुकुंद हिंगणे

    कमेंट्स मधून आपणा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याकरिता मनापासून धन्यवाद. अजूनही काही वाचकांना सबस्क्राईब आणि फॉलो कसे करायचे ? हा गोंधळ उडत असेल तर वर प्रतिक्रियेत मी सोपी पद्धत मराठीतून दिलेली आहे ती वाचून त्याप्रमाणे फॉलो केले तर प्रत्येक आर्टिकल मेलद्वारे आपल्या पर्यंत पोहोचेल. ज्यावर प्रतिक्रिया देत आपला सहभाग नोंदवता येईल.🙏🙏🙏

    Liked by 1 person