Author: मुकुंद हिंगणे

 • गेल्या दोन वर्षांपासून विदेशाचे आकर्षण कमी होतंय का ?

  उच्च शिक्षणासाठी, व्यवसाय किंवा नोकरीसाठी, डॉलरच्या कमाईसाठी विदेशात स्थलांतरित होण्याच्या भारतीयांच्या स्वप्नांना कोविड 19 महामारीमुळे चांगलाच ब्रेक लागला असं म्हणता येईल. संयुक्त अरब अमिराती, दुबई, कुवैत, अमेरिका, लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशातून चांगला पैसा कमावून भारतात परत यायचं. हे स्वप्न पाहणारे आजही अनेक भारतीय तरुण-तरुणी गेल्या दोन वर्षांपासून ‘कधी एकदा सुरळीत होतंय या संधीची वाट…

 • ग्रामीण महाराष्ट्रात “हुरडा पार्टी”ची लगबग सुरू..!

  मकरसंक्रांतीनंतर म्हणजेच साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शेतकरी बांधवांच्या “हुरडा पार्टी”च्या आयोजनाची लगबग सुरू होते. ‘हुरडा’ म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातून ग्रामीण भागात आता हुरडा पार्ट्यांना धुमधडाक्यात सुरुवात होते. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा तालुका ज्वारीचे कोठार समजल्या जातो. त्यामुळे सोलापुरी हुरडा पार्ट्यांची रंगतच न्यारी असते.…

 • बचतीच्या संस्काराने महामारीतही भारतीयांचे हाल कमी…!

  भारतीयांचे अर्थशास्त्र हेच मुळात बचतीच्या सुत्रांवर उभारलेले आहे. अर्थात बचत हीच भारतीय असण्याची ओळख आहे. तीच भारतीयांची संस्कृती आहे. संस्कृती वरून आठवलं….संस्कृती म्हंटलं की सर्व धर्म त्यात आले. भारतात राहणारे सर्व धर्मीय पहिल्यांदा भारतीय आहेत. नंतर ते त्यांच्या धर्माचे, कुटुंबाचे, समाजाचे आहेत. त्यामुळेच भारतात पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणारे देखील पहिल्यांदा ते भारतीय म्हणून ओळखले जातात. त्यांना…

 • “लॉक डाऊन” हा क्राऊड फोबिया बनतोय काय…?

  कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडून सतत पुकारण्यात येणाऱ्या निर्बंधाची आणि लॉक डाऊनची दहशत कायम असून आता या दहशतीची हळूहळू सवय होवू लागली आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात आधीच आत्ममग्न झालेले समाजजीवन मोबाईल पाठोपाठ आता लॉक डाऊनच्या ‘फोबिया’ने ग्रस्त झाले आहे. लॉक डाऊन हा कोविडशी लढण्याचा पर्याय नक्कीच नाही. पण लोकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या आड…

 • ३५ देशांना ईलॅस्टोमर सील्स पुरविणारी सोलापुरी उद्योजकाची “क्रॉस इंटरनॅशनल”कंपनी

  मराठी माणूस चाकरमानी असतो. तो उद्योजक बनायचं कधीच धाडस करीत नाही. हा गैरसमज दूर करीत महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या आडवळणी शहरात पंचवीस वर्षांपूर्वी “क्रॉस इंटरनॅशनल” या नावाने सुरू झालेल्या उद्योगाने आता जगातील ३५ देशांमधील बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला पोहोचविले आहे. सोलापूर शहरालगत असलेल्या ‘कुंभारी’ या गावातील काशिनाथ रेवप्पा ढोले यांनी एमएस्सी (इनऑरगॅनिक केमिस्ट्री) ही पदव्युत्तर पदवी संपादन…

 • मलाबार नीमची (मेलिया डुबिया) शेती करणारे युवा शेतकरी नवनाथ तोरणे

  अवर्षणग्रस्त भागातील शेती म्हणजे निव्वळ जुगार असतो. मात्र इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडिंगच्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर तीन-तीन कंपन्या स्थापन करणाऱ्या युवा उद्योजक नवनाथ श्रीमंत तोरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील हराळेवाडी (ता.-मोहोळ) येथे तीन एकरात मलाबार नीम (मेलिया डुबिया)ची अडीच हजार रोपे लावून शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीचा प्रयोग केला आहे. पारंपारिक शेतीमधून नुकसान सोसत कर्जबाजारी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवनाथ तोरणे…

 • जगातील सर्वाधिक उंच पुतळे आता भारतातच !

  जगातील सर्वाधिक उंचीचे पुतळे कोणते ? असा प्रश्न विचारला तर पूर्वी न्यूयॉर्कच्या ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चे नाव घेतले जायचे..मात्र आता या श्रेयनामावलीत भारतातील दोन सर्वाधिक उंचीचे पुतळे आता पुढील काही दिवसात समारंभपूर्वक सामील होत आहेत. भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरणाऱ्या या सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यातून भारतीय संस्कृती आणि तिची महानता देखील जगाला आकर्षित करणारी…

 • माजी उपमुख्यमंत्र्यांची ‘शेतकरी’पत्नी

  महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर गेल्या ६० वर्षांपासून मजबूत पकड असणाऱ्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याचा दबदबा सर्वश्रुत आहे. सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील आणि कै. रत्नप्रभादेवी यांच्या संस्कारात वाढलेल्या पुढच्या पिढीने सोलापूर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आपली विकासात्मक प्रतिमा निर्माण केली. सहकार क्षेत्र आणि राजकारणात अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. नंदिनीदेवी…

 • Hello World!

  Welcome to WordPress! This is my first post. अवती-भवती हा नवा ब्लॉग सुरू करतोय. आयुष्यभराचा प्रवास करताना बऱ्याच वेळा आपण गोंधळून जातो. अमुक एक विचार आपण का अंगिकारतोय ? मी हे करावं का ? माझ्या सोबत कुणी असेल का ? अश्या अनेक प्रश्नांची मेंदूत साखळी तयार होते. मग या प्रवासात आपल्याला एकटं वाटायला लागतं. पण…