Author: मुकुंद हिंगणे

 • जागतिक धान्य संकट आणि भारताचे धोरण

  १९७२ चा दुष्काळ किंवा युद्धानंतरचा भारत ज्यांनी कळत्या-समजत्या वयात पाहिला-अनुभवला आहे अशी पिढी आता वृद्धापकाळाकडे झुकलेली आहे. पण ७२ च्या दुष्काळात अमेरिकेकडून मदत म्हणून डुकरांना खाऊ घालतात तो ‘मिलो’ (लाल गहू) ज्यांनी खाल्ला आहे, त्यांना ‘धान्य टंचाईचे’ संकट म्हणजे काय असते ? याची पुरेपूर जाणीव आहे. गेल्या दोन वर्षांचा ‘कोरोना’ महामारीचा काळ आणि त्यानंतर लगेचच […]

 • लोणावळा-खंडाळ्याच्या सौंदर्यावर आपण अतिक्रमण करतोय का ?

  अगदीच खूप वर्षांनी नाही पण या कोरोना महामारीच्या प्रतिबंधामुळे तब्बल दोन वर्षांनी कल्याण-ठाण्याकडे जाण्याचा योग आला. रेल्वेने जा किंवा बाय रोड जा..घाटावरून उतरायचं म्हणजे लोणावळा-खंडाळा लागणारचं. अलीकडे कामानिमित्त देखील मुंबईकडे जायचं आकर्षण राहिलंय ते येता-जाता धावता का होईना लोणावळा-खंडाळ्याचा ‘थंडावा’ अंगावर घेता येतो. खिडकीत बसून डोंगर, कडे-कपाऱ्या न्याहाळता येतात. एरवी घाटी लोकांना पनवेल पर्यंतचीच हवा […]

 • आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो…!

  आमच्या लहानपणी कॉलनीतील मुलं-मुली उन्हाळ्याच्या सुट्टीत झिम्मा-फुगडी, चोर-पोलीस, काच-कवड्या, पाच-तीन-दोन, बदाम सात, लॅडिस, डब्बा गुल, धप्पाकुट्टी असले खेळ खेळायचो. आमच्या मामाच्या गावाला रेल्वे जात नव्हती. तरी पण ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे गाणं जसं आम्हाला प्रिय होते. तेव्हढंच ‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’ हे झिम्मा गाणे पण प्रिय […]

 • ‘असनी’चे चार थेंब अन गारव्याची लहर

  एक तर वेधशाळेने सांगितल्या प्रमाणे वेळेवर पाऊस पडला असं कधीतरीच घडतं. नेमकं हे आर्टिकल लिहिताना आज मी हा सुखद अनुभव घेतोय. भारतीय वेधशाळेच्या या अद्ययावत बदलामुळे आपण खरंच अचूक झालो आहोत की काय ! असा उगीचच फील यायला लागलाय. एकतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून असनी चक्रीवादळाच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या न्यूजऍप वर एकसारखा वाचतोय. आता एकतर ही […]

 • प्रवासातील ‘भूक’ अन असंच ‘चटर-फटर’…!

  तुम्ही प्रवासाला निघताना कितीही तयारी करा, घरून चार घास पोटात ढकलून निघा. पण प्रवासात भूक ही लागतेच. बाय रोड प्रवास करणार असाल तर ठराविक ठिकाणी तुमच्या खान-पानासाठी थांबता येतं. रेल्वेने प्रवास करणार असाल तर मात्र चंगळच . अगदी तासाभराचा प्रवास करणार असाल तरी थेट आपल्याला खेटून उभे रहात ‘इडली-वडा, सँडविच, भेळ’ असं किरट्या आवाजात ओरडणारा […]

 • ‘येरमाळा मच्छी’ची अशी ही एक कहाणी

  मासे खायचे म्हंटलं तर समुद्र किनारपट्टी लाभलेला कोकण नजरेसमोर येतो. त्यातही मालवणी मच्छी म्हंटलं तर नुकताच पोटभर जेवलेला देखील पुन्हा ताटावर बसेल. जिथं पाण्याचा मोठा साठा तिथं मच्छीची बक्कळ पैदास…कोकण सोडून चांगल्या चवीची मच्छी कुठं मिळणार ? पण यालाही आता घाटीप्रदेशात उत्तर मिळालय…. ‘येरमाळा मच्छी’ हेच त्याचं उत्तर. जिथे पाण्याचा साठा नाही, जिथे जलाशय नाही, […]

 • अदानींचा माध्यमप्रवेश अन व्यावसायिक पत्रकारिता

  भारतात अगदी बोटावर मोजण्याइतके गर्भश्रीमंत, अब्जोपती आहेत, ज्यांचा समाजमनावर आणि राजकारणावर ‘पगडा’ आहे. त्यातही काही अब्जोपती देशात मोठे घोटाळे करून देशाचे आर्थिक नुकसान करत देशातून पळून देखील गेले आहेत. तरीदेखील भारतीय उद्योग-व्यापारावर पगडा असणाऱ्या काही उद्योजक घराण्याचा भारतीय राजकारणावर प्रभाव आहे. त्यामुळे सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या भारतीय राजकारणात मात्र सत्तेत असणारे राजकीय नेते आणि पक्ष […]

 • ऐतिहासिक ओळख असलेल्या परांड्याचे टोमॅटो आम्लेट अन गुलाबजामुन

  पुराणकाळात ‘परमधामनगर’, ‘प्रचंडपूर’ असा उल्लेख असलेले ‘परांडा’ हे गाव जवळपास दीडहजार वर्षांचा इतिहास मिरवणारे इतिहासकालीन गाव भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी राजवटीत मुहंमद गवान या सरदाराने हा ३६ बुरुज असलेला प्रचंड असा भुईकोट किल्ला बांधला. कल्याणीच्या चालुक्यापासून दक्षिण भारतात स्थिरावलेल्या अनेक राजवटी अहमदनगरची निजामशाही, मुघल, काही वर्षे शहाजीराजे भोसले यांच्यामुळे विजापूरच्या आदिलशाहीत […]

 • दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचा अद्वितीय नजराणा…

  मायक्रो फायबर टॉवेलवर छापले वृत्तपत्राचे पहिले पान…! भारतीय वृत्तपत्रसृष्टीत सर्वाधिक खपाचे पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक वृत्तपत्रसृष्टीत तिसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भास्कर’च्या दैनिक दिव्यमराठी, सोलापूर आवृत्तीने आपल्या कल्पक आविष्कारातून दि. २३ एप्रिल २०२२ च्या अंकातून अद्वितीय असा नजराणा वाचकांसमोर ठेवला आहे. दैनिक दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून जागतिक वृत्तपत्रसृष्टीत पहिला अद्वितीय […]

 • आशिया खंडात प्रसिद्ध पावलेल्या गिरणगावाचे भग्नावशेष..!

  ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेंव्हा नुकतेच औद्योगिक युग सुरू झाले होते. भारतातील पिकणारा उत्तम प्रतीचा कापूस जहाजांनी भरभरून नेत इंग्रजांनी इंग्लंडमधील मँचेस्टर सिटीला वस्त्रोद्योगाचे वैभव प्राप्त करून दिले. भारता सारख्या देशाला गुलाम देश बनविणाऱ्या इंग्रजांचा हा सर्वात मोठा फायदा ठरला होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपीय देश आर्थिक मंदीच्या […]