Author: मुकुंद हिंगणे
-
बिनघोर ऱ्हावा…. सत्ता आपलीच, चिंचेच्या झाडावरला ‘भुत्या’ गरजला…!
भुस्कटवाडी सध्या लई चर्चेत आलीय. त्याचं कारण बी तसंच हाय. संपूर्ण राज्यात भुस्कटवाडी गावाला कोरोनाकाळात लसीकरण मोहिमेत ‘एक नंबरच’ गाव म्हणून ‘फेमस’ करणाऱ्या भुस्कटवाडी ग्रामपंचायतीमध्ये लई मोठं कांड घडलंय. तीन गटांना सोबत घेवून ग्रामपंचायतीवर सत्ता करणाऱ्या भाकरे-पाटलांच्या कारभारावरच थेट हल्ला झालाय. दोन वर्षात दीड वर्ष तर निक्कं बंदच होता. त्यो कोरोना अंगात शिरू नये म्हणून […]
-
कट्टा विधानसभानाम चर्चास्य कॅरेक्टरम् ढासळम्…!
वाचायला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो….हे कसलं शीर्षक ? नक्की कोणत्या भाषेतील ? असला कोणताही थुकरट सवाल मनात न आणता ही सोशल मीडिया मुक्त विद्यापीठाची स्वतंत्र भाषा आहे असा समज करून आत्मसात करावी. मग मराठी की इंग्लिश की संस्कृत किंवा पाली, हिब्रू, मोडी असे सामान्यज्ञानाचे ‘तारे’ तोडणारे बुद्धिकौशल्य न वापरता बात को समझो ना यार……तर मराठी […]
-
विदेशी शिक्षण अन् गल्लीतलं राजकारण…!
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील लोकशाहीप्रमाण राजकारण अधिक परिपक्व होत चाललंय, असा डांगोरा गेल्या कित्येक वर्षांपासून पिटवला जात आहे. अनुभवसंपन्न असणे आणि शिक्षित-उच्चशिक्षित असणे हे दोन वेगवेगळे स्तर आहेत. यानुसार भारतीय लोकशाही ही निश्चितच अनुभवसंपन्न झाली आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. कारण ७५ वर्षांचा कालावधी हा थोडा तर नक्कीच […]
-
‘भगवा ते तिरंगा’….विरोधकांना चकमा देणारी मोदींची ‘राष्ट्रभक्ती’ची थेअरी..!
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध स्फूर्तिदायक घटना यांचे सतत स्मरण रहावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे […]
-
सत्तासंघर्षातून महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाची निर्मिती शक्य ?
गेल्या तीन आठवड्यापासून महाराष्ट्राच्या सत्तेला सुरुंग लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भगदाड पाडणारे एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत पन्नासएक आमदार-मंत्री घेऊन सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे सफर करीत अवघ्या दहा दिवसांत सत्तांतर घडवून आणत अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. जून महिना मावळताना सत्तांतर नाट्याच्या पहिल्या अंकावर सुखद कलाटणीने पडदा पडला असला तरी दि. १ जुलै पासून […]
-
‘अफिलियन फेनोमेनन’ची सोशल मिडियावरची थंडी !
अफेलीयन फेनोमेनन (Aphelion Phenomenan) ही सौर मंडल मधील एक स्थिती आहे. अगदी समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचे तर पृथ्वी आणि सुर्यामधील अंतर वाढले तर ‘अफेलीयन फेनोमेनन’ ही स्थिती तयार होते. तर पृथ्वी आणि सुर्यातील अंतर कमी झाले तर ‘पेरिहेलिऑन’ (Perihelion) स्थिती तयार होते. वर्षातून एकदा अश्या स्थिती निर्माण होत असतात. या दोन्हीही स्थितीमध्ये सूर्य आणि […]
-
वाम्बाळलेले आकाश अन् हुळहुळणारे राज्य सरकार…!
गेल्या सात दिवसांपासून देशातील सर्वात प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सत्ताकारणाच्या पटावर एव्हढे अनिश्चीततेचे वातावरण आणि संशयाचे वांझोटे ढग जमा झाले आहेत. एकूणच सत्तेतील महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीने आता सत्ताच उलथवून टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडियामधून दिवसरात्र यावरच […]
-
‘भटकंती’चा जन्म म्हणजे कस्तुरीमृगाच्या नाभीतील ‘कस्तुरी’..!
रायगडाच्या पायऱ्या चढून चांगली पाच वर्षे पूर्ण झालीत. वयाच्या आठव्या वर्षी शाळेच्या सहलीतून रायगड चढून गेल्यावर आता बावन्नव्या वर्षी पुन्हा तोच विक्रम केला म्हणून मित्रांनी कौतुक देखील केलं होतं. या पाच वर्षात नुसतंच घोकल्या गेलं पण रायगडाची माती काही मस्तकी लावण्याचा योग जुळून आला नाही. आजही (वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी) मी रोज न थकता वीस ते […]
-
सगळं जग पाकिस्तानला ‘भिकारी’ देश का म्हणतंय…?
मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हाच कोणत्या विषयावर लिहायचं नाही, हे पहिल्यांदाच ठरवून टाकले होते. त्यात पाकिस्तान आणि इस्लामीकरण हा विषय अगदी पहिल्या क्रमांकावर होता व आहे. पण शांतता आणि समाधानाने जगण्याच्या व्याख्येत जसं तुमच्या कुटुंबासोबतच तुमचा ‘शेजारी’ महत्वाचा असतो. अगदी तसंच. तुम्ही जसं तुमच्या शेजाऱ्याला वगळून शांतपणे आणि सुख-समाधानाने जगू शकत नाहीत अगदी त्याच […]
-
10 K व्ह्यूजचा टप्पा पार केला…..
जानेवारी २०२२ पासून कार्यान्वित केलेल्या माझ्या https://avatibhavati.in या मराठी ब्लॉगने दहा हजार दर्शकांचा टप्पा पार केला आहे. ब्लॉगच्या दुनियेत मराठी ब्लॉग चालविणे तसे दिव्यच आहे. एकतर जगातील बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या मुख्य प्रवाहात कमी बोलली जाणारी मराठी भाषा (संख्यात्मक दृष्टीने) असल्याने ब्लॉगला मऱ्हाठी प्रांताबाहेर कितीसा प्रतिसाद मिळणार ? हा प्रश्न आहेच. पण आपल्या सारख्या वाचकप्रेमींनी या […]