Author: मुकुंद हिंगणे

 • यंदाच्या पावसाळ्याने कांदा-टोमॅटोचा ‘वांदा’…….इधर भी,उधर भी..!

  निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झालाय. कधी पावसाने ओढ दिली म्हणून पाण्याअभावी पिके जळून जातात. त्यामुळे कृषी उत्पादनात घट होते. अश्यावेळी शेतकऱ्यांचा खर्च पण निघत नाही. कधी उत्पादन चांगले होते त्यावेळी उत्पादनाला बाजारात किमान भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला सारा शेतीमाल रस्त्यावर ओतून द्यावा लागतो. तर कधी पाऊस जास्त झाला तर सगळी पिके पुरात […]

 • कावळ्यांच्या प्रतीक्षेत पितरांचे श्राद्ध…!

  मराठी कॅलेंडरप्रमाणे भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मास्य समाप्ती होते आणि महालयारंभ होतो. यालाच पितृपक्ष पंधरवडा अर्थात श्राद्ध काळ समजतात. हा काळ थेट सर्वपित्री दर्श आमावस्ये पर्यंत असतो. या श्राद्ध काळात हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पितृसत्ताक काळात आत्म्याच्या शांतीसाठी पितरांना खाऊ घातले जाते. धार्मिक रिवाजाप्रमाणे या विधीसाठी कावळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. […]

 • भारत जोडो यात्रेने राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य होईल का..?

  २०१४ पासून नरेंद्र मोदी नावाच्या झंझावाती ‘भगव्या’ वादळामुळे ‘भुईसपाट’ होणाऱ्या भारतीय काँग्रेसची अस्तित्वाची लढाई आता आत्मघाताच्या टप्प्यावर येवून पोहोचली आहे की काय…? अशी भीती वाटावी इतकी भयावह स्थिती ज्येष्ठ काँग्रेसजन अनुभवत आहेत. तर तरुणाईला वाव या नावाखाली ‘राहुल गांधी’ यांचे कट्टर समर्थक म्हणवून घेत पक्षाला केवळ ‘सोशल मीडियावर’ दररोज पोस्टाळत ‘ऍक्टिव्ह’ ठेवणाऱ्या खोगीर भरतीने काँग्रेस […]

 • जागतिक दर्जाची उपचारसेवा प्रदान करणारे सोलापूर ‘मेडिकल हब’ केंव्हा होणार…?

  गेल्या दशकापासून सोलापुरातील वैद्यकीय उपचारसेवा क्षेत्रात कमालीचे बदल घडत असून अद्ययावत यंत्रणेसह सर्वसुविधांयुक्त अनेक हॉस्पिटल्स रुग्णसेवेत कार्यमग्न झालेली दिसत आहेत. भौगोलिक दृष्ट्या सोलापूर शहर हे पश्चिम महाराष्ट्रात असले तरी मराठवाडासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच वैद्यकीय उपचारासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या तीनही राज्यातील रुग्ण सोलापुरात उपचार घेण्याला प्राधान्य देतात. रस्ते महामार्गासह रेल्वेने […]

 • भित्र्या सश्याने ऑस्ट्रेलियाला घाबरवून सोडलंय…!

  भित्रा परंतु चपळ म्हणून परिचित असलेला ससा हा प्राणी मूळचा ऑस्ट्रेलियाचा प्राणी नाही. हा प्राणी ऑस्ट्रेलियात आला कसा ? याची पण रंजक कहाणी आहे. सुमारे १६३ वर्षांपूर्वी म्हणजेच १८५९ मध्ये ख्रिसमसची सांताक्लॉजची भेट म्हणून आलेल्या २४ सश्याची पैदावार वाढत जावून आजच्या घडीला ती वीस कोटींच्या घरात पोहोचली आहे. अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये वीस कोटी […]

 • रशियाची लोकसंख्या घटण्याची समस्या आणि आपण भारतीय….!

  संपूर्ण जगात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या दहा देशांच्या यादीत नवव्या क्रमांकावर असणाऱ्या रशिया या देशात सध्या जन्मदर वाढीचा विषय चिंतेचा बनला आहे. शीतयुद्ध काळानंतर म्हणजेच १९९० नंतर सोव्हिएत संघाचे तुकडे होवून रशिया हा सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला देश शिल्लक राहिला. मात्र त्यावेळेपासून लोकसंख्येत घसरण सुरू झाली होती. लोकसंख्या वाढली तर एखाद्या देशाच्या नियोजन आणि नियंत्रणाचा बोजवारा […]

 • इतिहास हा द्वेषाचा नाही तर उपजीविकेचा प्रशस्त मार्ग बनू शकतो…!

  सभ्यता, संस्कृती, संस्कार, परंपरा, भौगोलिक समृद्धी आणि शौर्याची प्रतीके यांनी मिळून इतिहास तयार होतो. हा ‘इतिहास’च आपली खरी ओळख असते. जे लोक आपल्या समृद्ध इतिहासाला नुसतीच दंतकथा म्हणून स्मरणात न ठेवता त्याची प्रतीके जतन करून ठेवतात त्यांचाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो. इतिहासाकडे न पाहता वर्तमानाकडे पहा असा सल्ला देणाऱ्यांना एकच सांगावे वाटते. इतिहास हा ‘द्वेषाचा’ नाही […]

 • डॉलरपेक्षा भारतीय रुपया कधी मोठा होईल का…?

  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतीयांसमोर नेमके कोणते स्वप्न असायला हवे…? आज सर्वच क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताने आघाडी घेतल्याचे चित्र समोर असताना आपण कोणते स्वप्न पहायला हवे..? पूर्वी दळणवळण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात पिछाडीवर असलेला भारत देश गेल्या काही वर्षात आघाडीवर दिसत आहे. विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपण नेमके कुठे कुठे कमी पडत आहोत…? […]

 • आर्थिक घोटाळ्यात अडकलेला पहिला मराठी संपादक

  एकदा का आपल्या अब्रूचं खोबरं उधळायला लागलं की तो माणूस आपल्याला चिकटलेल्या किंवा चिकटवून घेतलेल्या समाजमान्य उपाध्यांचं सुरक्षा कवच आपल्या भोवती गुंडाळायला लागतो. तर त्या उपाध्यांशी निगडित असणारा वर्ग ‘तो आपला कुणीच नाही’ या अविर्भावात त्याची उरलीसुरली (नसलेली) अब्रू चव्हाट्यावर आणायला लागतो. शिवसेनेचे जगतव्यापी प्रवक्ते, मुखपत्राचे तथाकथित कार्यकारी संपादक, राज्यात सत्ता निर्माण करणाऱ्या महाआघाडीच्या संस्थापकांपैकी […]

 • सध्याचे भारतीय राजकारण डिवचण्याचे….अडथळ्यांचे की सुडाचे…..?

  सततची वेगवेगळ्या मागण्यांसाठी केलेली आंदोलने त्यातून सत्ताधारी राजकीय पक्षाने विरोधकांची आंदोलने चिरडण्याची घेतलेली भूमिका, वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्षांची राज्यसरकारे कोसळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या राजकीय कुरघोड्या, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची मालिका याबरोबरच सध्या सर्वत्र कळीचा मुद्दा बनलेल्या ईडीची कारवाई यामुळे पंचाहत्तर वर्षांची झालेली लोकशाही प्रगल्भ झाली आहे की अविकसित दुर्बल हाच प्रश्न देशवासियांना पडला आहे. त्यामुळे ईडी सारख्या […]