Author: मुकुंद हिंगणे
-
या पाव्हणं…राजाच्या ‘ झोपडीत ‘ आपलं स्वागत आहे…..!
कोल्हापूर पासून अवघ्या २०-२२ किलोमिटर अंतरावर असलेल्या किल्ले पन्हाळगडावर कधी मुशाफिरी केली आहे का..? तर तुम्हाला ‘ राजाची झोपडी ‘ आणि प्रवेशद्वारावरच अतिशय आत्मीयतेने ” या पाव्हणं….राजाच्या झोपडीत तुमचं स्वागत आहे ” असं म्हणत दिलखुलासपणे स्वागत करणारा डॉ. राज होळकर ही मैत्र जपणारी व्यक्ती नक्कीच माहीत असेल. माहीत नसेल तर एकदा जावून पहा….एका भेटीत देखील…
-
बालपणी मनावर कायमची कोरल्या गेलेली स्मृती स्थळे..!
मला वाटतं भ्रमंती हा माणसाचा स्थायी भाव असावा किंवा फारतर भ्रमंती म्हणजेच आयुष्य असं म्हणायला हरकत नाही. फक्त यातली गंमत एकच असते, ही भ्रमंती खूप उशिराने आपल्या आठवणीत येते. मग मेंदूमध्ये आकाराला आलेल्या ‘ त्या ‘ स्मृती स्थळांचा मनाच्या वेगाने आपण पाठलाग करायला लागतो. पुन्हा एकदा भटकंती करीत ती स्थळे पाहण्याची मनाला ओढ लागते. हे…
-
‘ मोदी जॅकेट ‘ मुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविणारे सोलापूरचे ‘B.Y.Tailors’
गुजरात दंग्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून जगासाठी आशावादी नेतृत्व म्हणून उदयाला आले. एकवेळ मागितला नसताना व्हिसा नाकारण्याची भूमिका मांडणाऱ्या अमेरिकेने तर गेल्या आठ वर्षांत मोदींचे नेतृत्व नुसतेच मान्य केले नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर सन्मानाचे स्थान दिले. कोणे एकेकाळी ‘ फॅसिस्ट ‘ म्हणून मोदींकडे भयभीत…
-
सारखा काळ चालला पुढे…
विश्वचक्र हे अविरत फिरते मरणामधूनी जीवन उरते अश्रू आजचे उद्या हासती, नवलं असे केवढे ! सारखा काळ चालला पुढे कुणाचे कोणावाचून अडे ? मराठी चित्रपट ‘दोन घडीचा डाव’ मधील कवयत्री शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गाणं….. माझ्या पिढीच्या अगोदरच्या पिढीच्या ओठावर रुंजी घालणारे हे गाणे आणि हा चित्रपट १९५८ मध्ये पडद्यावर झळकला होता. मोठ्यांच्या तोंडून…
-
दिल्ली विमानतळावर पहिल्यांदाच ‘रामायण’…!
मागच्या आठवड्यात माझे व्यावसायिक मित्र राकेशजी नारवानी हे कामानिमित्त दिल्ली मुक्कामी होते. जाताना आणि येताना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनही टर्मिनल वर साक्षात् प्रभूरामचन्द्र,सीतामाई,लक्ष्मणाला वानरसेना आणि बजरंगबलीसह शॉपिंग गॅलरीत रावण सेना आणि महा पराक्रमी लंका अधिपति रावण यांच्याशी भीडताना हजारो विदेशी पर्यटकांनी पाहिले. उत्तर भारतात ‘ रामलीला ‘ हा प्रचलित आणि पुरातन नाट्य प्रकार…
-
घरगुती चवीचाच ‘फराळ’ हवा ! मग ‘रानवेध’ आहे ना तुमच्या मदतीला……!
भारतीयांमध्ये सर्वात उत्साहाने साजरे होणारे प्रामुख्याने दोनच उत्सवी सण समजले जातात. एक म्हणजे गणपती बाप्पांचा ‘गणेशोत्सव’ आणि दुसरा प्रकाशाचा दीपोत्सव म्हणजेच ‘दिवाळी’. भारतीय म्हणजे मग धर्म कुठलाही असुद्यात. या दोन प्रमुख उत्सवी सणा मध्ये प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा सहभाग हा असतोच. त्यामुळेच हे दोन्हीही सण खऱ्या अर्थाने सर्वधर्मीयांचे. दिवाळी आता अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे.…
-
एक सिनेमा सत्तांतर घडवू शकतो का ?
अलीकडच्या काळात राजकीय व्यक्तींवरील चित्रपट बनविताना ते अधिक चर्चेत यावेत म्हणून वादग्रस्त आणि वास्तववादी बनविण्याचा ‘ट्रेण्ड’ भारतीय चित्रपट क्षेत्रात दिसत आहे. समाजावर चित्रपटांचा प्रभाव पडतो. या एकाच प्रचारवादी तत्वाला हाताशी धरून राजकीय क्षेत्रात उलथापालथ घडविणारे यापूर्वीही चित्रपट येवून गेले आहेत. पण खळबळ उडवून देण्याबरोबरच ‘गल्ला’ जमवण्याचा उद्देश साध्य झाल्यानंतर असे चित्रपट पडद्यावरून कधी गायब झाले…
-
हत्ती पुजला…..पाऊस आला…..!
भारतीय संस्कृतीची गंमतच न्यारी आहे. बदलत्या ऋतुमनाचे स्वागत असो किंवा धार्मिक रूढी-परंपरा असोत, सगळ्या सादरीकरणाला उत्सवाचं स्वरूप दिलेलं असतं. देवाधिकांच्या पूजनाचे सणवार असले तरी देखील सर्व समाज एकजिनसी रहावा असेच त्याचे उत्सवी स्वरूप योजून दिलेले आहे. सणवारात तर पुरुषवर्गापेक्षाही स्रीजातीचा अधिक आदराने समावेश केलेला दिसतो. नुकताच नवरात्र आणि दसरा उत्साहात संपन्न झाला. या नवरात्री पर्वात…
-
उस्मानाबाद जिल्ह्यात बहरतेय ‘मोत्याची’ शेती..!
सतत पाण्याचे दुर्भिक्ष असणारा जिल्हा म्हणून मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या दशकापासून पारंपारिक शेती पद्धतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे. २०१५ सालापासूनच गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती करण्याचा प्रयत्न उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातून यशस्वी होताना दिसत आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगामी शेतीबरोबरच शेतीपूरक…
-
मास्टर भगवानदादा यांच्या बंधूंच्या प्रेरणेने सोलापुरात सुरू झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव !
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमातून सोलापूर शहराने इतिहासात आपले अस्तित्व अग्रक्रमाने ठेवले आहे. महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी ओळख असलेल्या श्री श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपती मंडळाची स्थापना ही १८८५ मध्ये झाली. याच गणपतीच्या पूजेसाठी आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुढे यातून प्रेरणा घेत महाराष्ट्रभर सार्वजनिक गणेशोत्सव राबविण्याची संकल्पना तडीस नेली. महाराष्ट्रातील…