Author: मुकुंद हिंगणे

  • ब्लॉगचा पहिला वाढदिवस अन नववर्षाची उत्सुकता…!

    तसा मी सोशल मीडियावर रुळलोय असं म्हणण्या इतपत दुड्डाचार्य नक्कीच झालेलो नाही. अँड्रॉईड मोबाईल घ्यायलाच मुळात खूप उशीर झाला होता. त्यामुळं सोशल मीडियाची चटक लागायला तसा बराच उशीर झालेला. त्यात पुन्हा पन्नाशी पार केल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सोशल मीडियावर स्वार व्हायचं म्हणजे एक दिव्यच. ऑफिसमधील टेलिफोन किंवा फारच गरज पडली तर क्वॉईन बॉक्सवर आपले…

  • १७० वर्षे जुन्या सोलापूर म्युनिसिपल कार्पोरेशनचा इतिहास !

    शहरातील उत्पादित मालावर कर आकारणी करून जमा झालेल्या पैशातून शहर सुधारणेच्या निरनिराळ्या योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या (कलेक्टर) अधिपत्याखाली राबविताना ब्रिटिश सरकारला एका स्वतंत्र स्वायत्त संस्थेची आवश्यकता लक्षात आली. कारण कलेक्टरच्या वेळोवेळी बदल्या केल्या जात असल्याने मागाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्या योजनांचा पाठपुरावा होत नसल्याने योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यास विलंब आणि मूळ योजनेच्या खर्चात वाढ होत असल्याची बाब ब्रिटिश…

  • नव्या वर्षाची सेल्फ प्रॉमिसची टूथ पेस्ट…!

    तसं पहायला गेलं तर बारा महिन्यांचा काळ लोटला की नवे वर्ष सुरू होते. कालमापनाची ही सनावळी शतकानुशतके सुरू आहे. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षे सरत असतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आख्खी रात्र जागवली (नाचवली) जाते. सरणाऱ्या वर्षाचा ३१ डिसेंबर हा दिवस (अख्खी रात्र म्हणा हवं तर) तेव्हढ्या साठीच योजिलेला…

  • प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापिलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुजलेले पैठणचे दोलेश्वर मंदिर

    श्रद्धा, भक्तिभाव आणि मौखिक माहिती परंपरेने जतन करण्याच्या संस्कारातूनच हिंदू धर्माची पाळेमुळे शतकानुशतका पासून घट्ट रुजलेली आहेत. म्हणूनच स्थळ-काळ आणि वेळेची आत्ता सांगड घालता येत नसली तरीही अश्या पुराणकालीन वदंतांना समाज मान्यता असते. विशेषतः धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांबाबत प्रगत शास्त्राचे तर्क गुंडाळून ठेवले तरच पुरातन संस्कार आणि संस्कृतीचे महत्व समजू शकते. मुळात रामायण…

  • आम्ही नाथांच्या पालखीचे भोई…..दार उघड बया….

    समाज जीवनामध्ये सामाजिक संतुलन रहावे, समाज सर्व विकारमुक्त व्हावा, भोळ्याभाबड्या माणसाला राज्यकर्त्यांचे संरक्षण मिळावे यासाठी दैवी शक्तीचे प्रकटीकरण होणे ही केवळ मध्ययुगीन कालखंडातीलच गरज नव्हती तर आजचीही गरज आहे. तेज, बल आणि बुद्धीचा समन्वय साधणाऱ्या विकारमुक्त निर्भय समाजाच्या निर्मितीसाठी आदिशक्ती दुर्गा देवीला आवाहन करताना संत एकनाथ महाराज म्हणाले होते….. अलक्षपुर भवानी दार उघड, कोल्हापूर लक्ष्मी…

  • डावा नकार….उजवा होकार, स्थिर अनिश्चित…प्रयत्नाने होईल…!

    शीर्षक वाचल्यावर तुम्ही नक्कीच गोंधळात पडला असाल,…एकतर तुटकतेने काहीतरी सुचविणारे हे वाक्य भारताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे असावे असे वाटत असेल. आजकाल अश्या स्लोगनचे फलक हे राजकीय विषयांसाठीच वापरले जातात. पण छायाचित्रात नीट बारकाईने पाहिले तर तो फलक तुम्हाला नक्कीच परिचित वाटत असावा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आयुष्यात एकदाही तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात गेला…

  • युवा शेतकऱ्याच्या प्रयोगशील हंगामाची यशस्वी कहाणी…!

    या देशातील पारंपारिक पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे जसे आजही अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, त्याचप्रमाणे प्रयोगशील शेतकऱ्यांचे सकारात्मकता निर्माण करणारी अनेक उदाहरणे देखील आहेत. अर्थात अनुत्तरित प्रश्नांच्या तुलनेत ही उदाहरणे संख्यात्मक दृष्टीने कमी असल्याने आपण त्याकडे फार गांभीर्याने पहात नाही. विकासाच्या योजना जश्या माणसाच्या जगण्यामध्ये सुलभता आणि सुबत्ता आणतात. तश्याच त्या परंपरा, सभ्यता आणि संस्कृतीला बाधा…

  • जागतिक बाजारपेठेत स्वयंपूर्ण भारताची ओळख करून देणारी बालाजी अमाईन्स लिमिटेड

    सोलापूर शहरापासून अवघ्या १६ – १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तामलवाडी येथील रासायनिक उत्पादनांची निर्मिती करणारी बालाजी अमाईन्स लिमिटेड ही कंपनी केवळ सोलापूर – उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र राज्य अथवा देशात नाही तर जगात नावलौकिक प्राप्त करणारी कंपनी ठरली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात बालाजी ग्रुपचे अनेक उद्योग प्रकल्प विस्तारलेले आहेत. १९८८ साली एका सयंत्रापासून सुरू करण्यात…

  • किल्ल्याची माहिती देणारा गाईडच इतिहासाचा खरा अभ्यासक…!

    उपाशी पोटी इतिहास जपल्या जातो…तर भरल्या पोटी त्याची विटंबना…. परवा म्हणजे ५ नोव्हेंबरला दै. दिव्यमराठीच्या टीम सोबत किल्ले पन्हाळगडावर मुशाफिरी करण्याचा योग जुळून आला होता. तशी किल्ले पन्हाळगडावर जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. महाराष्ट्रातील गड – किल्ले कोणतेही असोत….भलेही अनास्था आणि दुर्लक्षामुळे कितीही जर्जर झालेले असोत. त्या पावन भूमीवर पाय ठेवल्या क्षणी एका विलक्षण…

  • कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेचे अडथळे अखेर हटले….!

    राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते – पाटील यांनी ध्यास घेतलेल्या कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेच्या रखडलेल्या प्रस्तावाला अखेर दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिंदे – फडणवीस सरकारने अध्यादेशद्वारे मार्गस्थ केले आहे. एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात किंवा एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात पाणी वाहून नेण्यास ‘ पाणी तंटा लवाद ‘ आयोगाने बंदी घातली या…