Author: मुकुंद हिंगणे

 • जागतिक बाजारपेठेत स्वयंपूर्ण भारताची ओळख करून देणारी बालाजी अमाईन्स लिमिटेड

  सोलापूर शहरापासून अवघ्या १६ – १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तामलवाडी येथील रासायनिक उत्पादनांची निर्मिती करणारी बालाजी अमाईन्स लिमिटेड ही कंपनी केवळ सोलापूर – उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र राज्य अथवा देशात नाही तर जगात नावलौकिक प्राप्त करणारी कंपनी ठरली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात बालाजी ग्रुपचे अनेक उद्योग प्रकल्प विस्तारलेले आहेत. १९८८ साली एका सयंत्रापासून सुरू करण्यात […]

 • किल्ल्याची माहिती देणारा गाईडच इतिहासाचा खरा अभ्यासक…!

  उपाशी पोटी इतिहास जपल्या जातो…तर भरल्या पोटी त्याची विटंबना…. परवा म्हणजे ५ नोव्हेंबरला दै. दिव्यमराठीच्या टीम सोबत किल्ले पन्हाळगडावर मुशाफिरी करण्याचा योग जुळून आला होता. तशी किल्ले पन्हाळगडावर जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. महाराष्ट्रातील गड – किल्ले कोणतेही असोत….भलेही अनास्था आणि दुर्लक्षामुळे कितीही जर्जर झालेले असोत. त्या पावन भूमीवर पाय ठेवल्या क्षणी एका विलक्षण […]

 • कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेचे अडथळे अखेर हटले….!

  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते – पाटील यांनी ध्यास घेतलेल्या कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेच्या रखडलेल्या प्रस्तावाला अखेर दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिंदे – फडणवीस सरकारने अध्यादेशद्वारे मार्गस्थ केले आहे. एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात किंवा एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात पाणी वाहून नेण्यास ‘ पाणी तंटा लवाद ‘ आयोगाने बंदी घातली या […]

 • या पाव्हणं…राजाच्या ‘ झोपडीत ‘ आपलं स्वागत आहे…..!

  कोल्हापूर पासून अवघ्या २०-२२ किलोमिटर अंतरावर असलेल्या किल्ले पन्हाळगडावर कधी मुशाफिरी केली आहे का..? तर तुम्हाला ‘ राजाची झोपडी ‘ आणि प्रवेशद्वारावरच अतिशय आत्मीयतेने ” या पाव्हणं….राजाच्या झोपडीत तुमचं स्वागत आहे ” असं म्हणत दिलखुलासपणे स्वागत करणारा डॉ. राज होळकर ही मैत्र जपणारी व्यक्ती नक्कीच माहीत असेल. माहीत नसेल तर एकदा जावून पहा….एका भेटीत देखील […]

 • बालपणी मनावर कायमची कोरल्या गेलेली स्मृती स्थळे..!

  मला वाटतं भ्रमंती हा माणसाचा स्थायी भाव असावा किंवा फारतर भ्रमंती म्हणजेच आयुष्य असं म्हणायला हरकत नाही. फक्त यातली गंमत एकच असते, ही भ्रमंती खूप उशिराने आपल्या आठवणीत येते. मग मेंदूमध्ये आकाराला आलेल्या ‘ त्या ‘ स्मृती स्थळांचा मनाच्या वेगाने आपण पाठलाग करायला लागतो. पुन्हा एकदा भटकंती करीत ती स्थळे पाहण्याची मनाला ओढ लागते. हे […]

 • ‘ मोदी जॅकेट ‘ मुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविणारे सोलापूरचे ‘B.Y.Tailors’

  गुजरात दंग्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून जगासाठी आशावादी नेतृत्व म्हणून उदयाला आले. एकवेळ मागितला नसताना व्हिसा नाकारण्याची भूमिका मांडणाऱ्या अमेरिकेने तर गेल्या आठ वर्षांत मोदींचे नेतृत्व नुसतेच मान्य केले नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर सन्मानाचे स्थान दिले. कोणे एकेकाळी ‘ फॅसिस्ट ‘ म्हणून मोदींकडे भयभीत […]

 • सारखा काळ चालला पुढे…

  विश्वचक्र हे अविरत फिरते मरणामधूनी जीवन उरते अश्रू आजचे उद्या हासती, नवलं असे केवढे ! सारखा काळ चालला पुढे कुणाचे कोणावाचून अडे ? मराठी चित्रपट ‘दोन घडीचा डाव’ मधील कवयत्री शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गाणं….. माझ्या पिढीच्या अगोदरच्या पिढीच्या ओठावर रुंजी घालणारे हे गाणे आणि हा चित्रपट १९५८ मध्ये पडद्यावर झळकला होता. मोठ्यांच्या तोंडून […]

 • दिल्ली विमानतळावर पहिल्यांदाच ‘रामायण’…!

  मागच्या आठवड्यात माझे व्यावसायिक मित्र राकेशजी नारवानी हे कामानिमित्त दिल्ली मुक्कामी होते. जाताना आणि येताना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनही टर्मिनल वर साक्षात् प्रभूरामचन्द्र,सीतामाई,लक्ष्मणाला वानरसेना आणि बजरंगबलीसह शॉपिंग गॅलरीत रावण सेना आणि महा पराक्रमी लंका अधिपति रावण यांच्याशी भीडताना हजारो विदेशी पर्यटकांनी पाहिले. उत्तर भारतात ‘ रामलीला ‘ हा प्रचलित आणि पुरातन नाट्य प्रकार […]

 • घरगुती चवीचाच ‘फराळ’ हवा ! मग ‘रानवेध’ आहे ना तुमच्या मदतीला……!

  भारतीयांमध्ये सर्वात उत्साहाने साजरे होणारे प्रामुख्याने दोनच उत्सवी सण समजले जातात. एक म्हणजे गणपती बाप्पांचा ‘गणेशोत्सव’ आणि दुसरा प्रकाशाचा दीपोत्सव म्हणजेच ‘दिवाळी’. भारतीय म्हणजे मग धर्म कुठलाही असुद्यात. या दोन प्रमुख उत्सवी सणा मध्ये प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा सहभाग हा असतोच. त्यामुळेच हे दोन्हीही सण खऱ्या अर्थाने सर्वधर्मीयांचे. दिवाळी आता अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. […]

 • एक सिनेमा सत्तांतर घडवू शकतो का ?

  अलीकडच्या काळात राजकीय व्यक्तींवरील चित्रपट बनविताना ते अधिक चर्चेत यावेत म्हणून वादग्रस्त आणि वास्तववादी बनविण्याचा ‘ट्रेण्ड’ भारतीय चित्रपट क्षेत्रात दिसत आहे. समाजावर चित्रपटांचा प्रभाव पडतो. या एकाच प्रचारवादी तत्वाला हाताशी धरून राजकीय क्षेत्रात उलथापालथ घडविणारे यापूर्वीही चित्रपट येवून गेले आहेत. पण खळबळ उडवून देण्याबरोबरच ‘गल्ला’ जमवण्याचा उद्देश साध्य झाल्यानंतर असे चित्रपट पडद्यावरून कधी गायब झाले […]