ब्लॉगचा पहिला वाढदिवस अन नववर्षाची उत्सुकता…!

तसा मी सोशल मीडियावर रुळलोय असं म्हणण्या इतपत दुड्डाचार्य नक्कीच झालेलो नाही. अँड्रॉईड मोबाईल घ्यायलाच मुळात खूप उशीर झाला होता. त्यामुळं सोशल मीडियाची चटक लागायला तसा बराच उशीर झालेला. त्यात पुन्हा पन्नाशी पार केल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सोशल मीडियावर स्वार व्हायचं म्हणजे एक दिव्यच. ऑफिसमधील टेलिफोन किंवा फारच गरज पडली तर क्वॉईन बॉक्सवर आपले पब्लिक रिलेशन (पी आर) मजबूत असल्याच्या गुर्मीत वावरणाऱ्या माझ्या सारख्याला टुजी-थ्रीजीचे झेंगाट डोक्यात घुसायला जरा वेळच लागला. पाच-सहा वर्षे अँड्रॉईड मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सअप वापरत सुखावल्यावर लक्षात आलं…. आपल्याला व्यक्त व्हायला यापेक्षाही अजून वेगळं व्यासपीठ हवंय. मग स्वतःचं वेगळं माध्यम व्यासपीठ हवं या ऊर्मीने उचल खाल्ली. तोपर्यंत स्वतंत्र ब्लॉग असावा याची मनाशी खूणगाठ पक्की झाली होती. तोपर्यंत ब्लॉग कसा तयार करायचा ? त्याची तंत्रशुद्धता याविषयीचे मार्गदर्शन या कशाचाही मागमूस नव्हता. इंटरनेट वरून गुगल sarching वाढल्यावर या सगळ्याची माहिती मिळत गेली. त्यातूनच वर्ड प्रेस माहिती झाले. आधी ‘धागेदोरे’ नावाचा ब्लॉग सुरू केला. म्हणजे ब्लॉग कसा असावा, त्यावर लेख कसे लिहायचे याचं प्राथमिक शिक्षणच एकलव्यासारखं घ्यावं लागलं. जेंव्हा आत्मविश्वास वाढला तेंव्हा म्हणजे २८ डिसेंबर २०२१ रोजी avatibhavati.in हा ब्लॉग वर्डप्रेसवर सुरू केला. स्वतःच्या या धडपडीचं स्वतःला नक्कीच कौतुक असतं. म्हणूनच ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसाला हा लेखन प्रपंच करतोय. सोबत नववर्षाच्या स्वागताची उत्सुकता देखील आहे.

ब्लॉगला सुरुवात करताना सोबत तांत्रिक अडाणीपणा होताच त्याच बरोबर नेमका ब्लॉगचा विषय आणि दिशा याबाबत सुस्पष्टता नव्हती. आर्टिकल लिहिताना हा गोंधळ व्हायचा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईबर आणि फॉलोअर्स जोडायचे काम म्हणजे एक टास्कच असतो. एकतर ब्लॉग मराठीतून असल्याने जगाच्या इतर भाषिकांच्या तुलनेत मराठी भाषिक अल्पसंख्यच. त्यांना तुम्ही ब्लॉगसाठी आकर्षित करणे अवघडच. बरं सोशल मीडियावर असलेले तुमचे फॉलोअर्स तुमचा ब्लॉग फॉलो करतील हे अगदी खात्रीशीर सांगता येत नाही. त्यात सबस्क्राईब करण्याची पद्धती माहीत असेल तरच सबस्क्राईबर गोळा होतात. आपल्याकडे स्वतःचा ईमेल आयडी किती वापरात असतो ? एरव्ही फेसबुक सुरू करताना ईमेल आयडी लागतो म्हणून स्वतःचे ईमेल अकाऊंट काढणारे कितीजण आपले ईमेल अकाऊंट नियमितपणे वापरत असतात. कधी कधी सबस्क्राईब करताना ईमेल आयडी टाकून क्लिक करतात पण कन्फर्मेशन साठी वर्ड प्रेस कडून आलेला मेल बघण्याची तसदी देखील घेतलेली नसते. त्यामुळे सबस्क्राईब होत नाही. दोन-तीनदा प्रयत्न केल्यानंतरही कन्फर्मच्या मेलला रिस्पॉन्स दिला न गेल्याने ब्लॉगला कमी कालावधीत फॉलोअर्स जोडणे महाकठीण असते. अश्यावेळी सोशल मीडियावर व्ह्यूज मिळविण्यासाठी ब्लॉगमध्ये प्रसिद्ध झालेल्या आर्टिकलची लिंक टाकावी लागते. अर्थात हा प्रयोग अत्यंत चिकाटीने करावा लागतो. बऱ्याचवेळा रिडरची आवड लक्षात आली नाही तर व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळणे कठीण होते. शिवाय तुम्ही रिडर्सच्या शोधात सोशल मीडियावर प्रत्येक आर्टिकल शेअर करत असल्याने त्याला किचकट प्रोसिजर करून सबस्क्राईब करणे गरजेचे वाटत नाही. या सगळ्या अडथळ्यांना पार करीत तुम्हाला ब्लॉग चालवायचा असतो. म्हणूनच ब्लॉगचा वाढदिवस हा अप्रूप वाटणारा ठरतो. त्याबरोबरच आशावाद जपणाराही. सरत्या वर्षापेक्षा येणारे वर्ष आपल्याला चांगलेच जाणारे आहे हा आशावाद बाळगून जसं आपण दरवर्षी नव्या वर्षाचं स्वागत दणक्यात करतोच ना…जगाशी जोडल्या जाणारा ब्लॉग हाच आशावाद बळकट करतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

10

)

 1. Avinash Hingne

  प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !💐

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद अवि सर 🙏🙏

   Like

 2. Gopanie Don

  ✔️❤️बहूरंगी-बहूढंगीसह अफलातून विषय घेवून ब्लाॅग वर अभ्यास पूर्ण विषयाची मांङणी करणारे,मुकुंद हिगणे यांच्या,”अवती-भवती “ब्लॉग ला प्रथम वर्धापण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद मित्रा, आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले आहे. 🙏🙏

   Like

 3. aaliya sayyad

  Happy anniversary avatibhavati🥳🥳🥳🥳

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   थँक्स आलिया 🙏🙏

   Like

 4. aaliya sayyad

  Keep writing your blog like this👍👍👍

  Like

 5. Yuvraj Hirapure

  Abhinandan sir 🎉🎉

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद मित्रा 🙏🙏

   Like

 6. smitahingne

  हार्दिक अभिनंदन.

  Like

%d bloggers like this: