१७० वर्षे जुन्या सोलापूर म्युनिसिपल कार्पोरेशनचा इतिहास !

शहरातील उत्पादित मालावर कर आकारणी करून जमा झालेल्या पैशातून शहर सुधारणेच्या निरनिराळ्या योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या (कलेक्टर) अधिपत्याखाली राबविताना ब्रिटिश सरकारला एका स्वतंत्र स्वायत्त संस्थेची आवश्यकता लक्षात आली. कारण कलेक्टरच्या वेळोवेळी बदल्या केल्या जात असल्याने मागाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्या योजनांचा पाठपुरावा होत नसल्याने योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यास विलंब आणि मूळ योजनेच्या खर्चात वाढ होत असल्याची बाब ब्रिटिश सरकारच्या लक्षात आली. त्यानुसार १८५० मध्येच ब्रिटिश सरकारने नगरपालिका अस्तित्वात आणण्याचा कायदा मंजूर केला. या कायदा नुसार पुढे सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर अँड कमिशनर थॉमस सी. लाफमन यांनी १७२ नागरिकांच्या सह्यांच्या निवेदनानुसार सरकारकडे अहवाल सादर केला. या अहवालावरून ब्रिटिश सरकारने शहरवासीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करीत नागरिकांच्या हरकती मागविल्या. त्यानंतर दि. १ ऑगस्ट १८५२ मध्ये ९ सदस्य असलेली सोलापूर म्युनिसिपालटी (नगरपालिका) अस्तित्वात आली. पुढे १ मे १९६४ मध्ये या नगरपालिकेचे सोलापूर महानगरपालिकेत रूपांतर झाले. तर १९९२ च्या शहर हद्दवाढीनुसार शहर परिसरातील ११ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. १८५२ मध्ये ९ सदस्य घेवून सुरू झालेल्या सोलापूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर आता वाढीव प्रभागानुसार १०२ सदस्य आहेत.

सोलापूरला स्वतंत्र नगरपालिका हवी असा मागणी करणारा १७२ नागरिकांचा अर्ज ब्रिटिश सरकारला मिळाल्यानंतर ब्रिटिश सरकारने १५ ऑक्टोबर १८५१ रोजी गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून १८५० चा कायदा शहरास लागू करण्याला ज्यांची संमती असेल अगर हरकत असेल अशा नागरिकांनी दि. १ जानेवारी १८५२ पर्यंत सरकारकडे अर्ज सादर करावेत असे जाहीर केले. परंतु एकाही शहरवासियाने संमती अथवा हरकतीचा अर्ज पाठवला नाही. त्यानंतर सरकारने नगरपालिकेच्या स्थापनेसंबंधी सादर करण्यात आलेला सोलापूर नागरिकांचा अर्ज स्वतंत्र कमिशनर नेमून कसून चौकशी करण्यासाठी पाठविला. नागरिक खरोखरीच कर देण्यास तयार आहेत का ? म्युनिसिपालटीच्या स्थापनेस कोणाचा विरोध आहे का ? याची खात्री झाल्यावरच सरकारने अखेरचा हुकूम जारी केला. तत्पूर्वी सरकारने म्युनिसिपालटीवर कोणाकोणाला नेमावयाचे याबद्दल सोलापूरचे तत्कालीन कलेक्टर आणि कमिशनर थॉमस सी. लाफमन यांचे मत मागितले. नावे सुचविताना तो सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक असावा आणि सदस्यांची निवड सर्व जाती-धर्मामधून करावी अश्या सूचना सरकारने केल्या होत्या. याबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांची नावे शक्यतो सुचविली जावू नयेत असा आग्रह देखील व्यक्त केला होता. जेंव्हा नगरपालिका अस्तित्वात यावी असा नागरिकांचा आग्रह होता तेंव्हा सोलापूर हा अहमदनगर जिल्ह्याचा उपजिल्हा होता.

सरकारच्या सुचनेवरूनच तत्कालीन कलेक्टर थॉमस लाफमन यांनी ९ सदस्यांची नावे सरकारकडे सादर केली. यामध्ये १) नारायण जनार्दन सोनी, २) लक्ष्मण नरसु चाटी, ३) नरसु विठ्ठल नखाते ( सर्व ब्राह्मण ), ४) केरोजीराव देशमुख, ५) धर्मराव थोबडे ( दोन्ही लिंगायत, वाणी ), ६) सखाराम खुशाल गांधी ( गुजराती ), ७) नैनसुख शोभाराम पेढीचे मुनीम ठाकुरदास ( मारवाडी ), ८) हुसेनसाहेब रेशीमगार ( मुस्लिम ), ९) चिंतो सखाराम ( निवृत्त मामलेदार ) यांचा समावेश होता. चिंतो सखाराम ह्या निवृत्त मामलेदाराने नगरपालिकेच्या स्थापनेसाठीच्या पूर्वतयारीसाठी कलेक्टरला खूप साहाय्य केल्यामुळे त्यांची शिफारस केली होती. अशा रीतीने सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर आणि नगरपालिकेच्या स्थापनेपूर्वी जनतेची संपूर्ण संमती असल्याबद्दल पूर्ण खात्री करून घेण्याची दक्षता पाळली जावी अशी हिंदुस्थान व विलायत सरकारची खास इच्छा होती. ती पूर्ण केल्यानंतर मुंबई सरकारने दि. २१ जुलै १८५२ ला गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून दि. १ ऑगस्ट १८५२ पासून १८५० चा कायदा लागू केला. सोलापूर नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष हे अधिकारपरत्वे कलेक्टर थॉमस सी. लाफमन ठरले. तर १९६४ मध्ये महापालिकेत रूपांतर होताना शेवटचे नगराध्यक्ष आणि पहिले महापौर पारसमल जोशी ठरले. ब्रिटिश काळात कलेक्टर कचेरीत सुरू झालेल्या नगरपालिकेचे स्वतंत्र कार्यालय नवीपेठेत स्वतंत्र इमारतीत करण्यात आले. सध्या या इमारतीत महापालिकेचे प्राथमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. तर महापालिकेत रूपांतर झाल्यावर कार्यालय पार्क चौकातील पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या ‘इंद्रभुवन’ या आलिशान महालात स्थलांतरित झाले. सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ‘इंद्रभुवन’ या इमारतीचे बांधकाम हे अतिशय कलात्मकरित्या करण्यात आले आहे. भव्य प्रसादासारखी वास्तू बांधण्यासाठी पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांना १३ वर्षांचा कालावधी लागला होता. त्याकाळी जगभरात अत्याधुनिक समजले जाणारे तंत्रज्ञान या इमारतीसाठी उपयोगात आणले आहे. जगभरात अनेक देशात दौरे करून आप्पासाहेब वारद यांनी कलात्मक वस्तू आणि स्थापत्य कलेचे नमुने गोळा करून आणले होते. पर्यटकांचे खास आकर्षण ठरलेली ‘इंद्रभुवन’ ही इमारत सोलापूरचे वैभव आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

12

)

 1. Gopanie Don

  💯🎯 आताची महानगरपालिकेची स्थिती पाहता उपयुक्त आणि सुदर माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद गोपनीय डॉन 🙏🙏🙏

   Like

 2. rituved

  Chan mahiti

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद ऋतुवेद 🙏🙏🙏

   Like

 3. smitahingne

  चांगली माहिती.👍

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद 🙏🙏🙏

   Like

 4. dhpawar

  अतिशय चांगली आवश्यक माहिती बद्दल धन्यवाद सर

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद पवार सर 🙏🙏

   Like

 5. SUBHASH KULKARNI

  छान माहिती व शब्दांकन

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   कमेंट करायला जमलं तर एकदाचं 👍👍

   Like

 6. Yuvraj Hirapure

  Chhan 👍👍

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद युवराज 👍👍

   Like

%d bloggers like this: