‘ मोदी जॅकेट ‘ मुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविणारे सोलापूरचे ‘B.Y.Tailors’

गुजरात दंग्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेले विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून जगासाठी आशावादी नेतृत्व म्हणून उदयाला आले. एकवेळ मागितला नसताना व्हिसा नाकारण्याची भूमिका मांडणाऱ्या अमेरिकेने तर गेल्या आठ वर्षांत मोदींचे नेतृत्व नुसतेच मान्य केले नाही तर त्यांना आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर सन्मानाचे स्थान दिले. कोणे एकेकाळी ‘ फॅसिस्ट ‘ म्हणून मोदींकडे भयभीत नजरेने बघणारे जग भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींकडे अनुकरणीय नजरेतून आश्वासकतेने बघू लागले. पंतप्रधान मोदी यांची वेशभूषा, कार्यपध्दती, त्यांचे संभाषण कौशल्य सगळ्या सगळ्या गोष्टींचे जगभर अनुकरण होवू लागले. मोदींच्या वेशभूषेतील आकर्षित करणारे जॅकेट देखील ‘ मोदी जॅकेट ‘ म्हणून फॅशनचा ट्रेंड बनले. जगभर मोदी जॅकेटच्या उसळलेल्या लाटांचा थेट सोलापूरशी संबंध आहे. त्याचीच ही स्टोरी….

मोदी जॅकेट तयार करून देशांतर्गतच नव्हे तर जगभरात ख्याती मिळवलेल्या किरण येज्जा यांच्या B.Y.Tailors या टेलरिंग फर्मची १९७६ साली सोलापुरातील राजेंद्र चौकात सुरुवात झाली. सुरुवातीला एका शिलाई मशीनवर सुरू झालेल्या या व्यवसायाचे विस्तारीकरण करत २००४ मध्ये संचालक किरण येज्जा यांनी पार्क चौकातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमच्या शॉपिंग सेंटर मध्ये शॉप खरेदी करून तिथे अत्याधुनिक मशिन्स उपयोगात आणत ग्राहकांच्या सोयीसाठी, समाधानासाठी स्वतंत्र दालन सुरू केले. गुणवत्तापूर्ण शिलाईचे साहित्य, संभाषण कौशल्य आणि वेळेत ड्रेस शिवून देण्याची किमया साधणाऱ्या किरण येज्जा यांनी ग्राहकांचे समाधान याला आपल्या व्यवसायाचे ब्रीद बनवित व्यवसायाचे विस्तारीकरण करीत B.Y.Tailors ला‌ ‘ ब्रॅण्ड ‘ बनवले. सूट स्पेशालिस्ट म्हणून ओळख मिळविलेल्या येज्जा पिता – पुत्राच्या समाधान देणाऱ्या ग्राहक सेवेमुळे संतुष्ट होत ग्राहकांनीच माऊथ पब्लिसिटी द्वारे या ब्रॅण्डला सोलापूर बाहेर नेले.

B.Y. Tailors कडून ड्रेस शिवून घेण्याची मागणी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, दिल्ली या प्रदेशातून वाढू लागली. ग्राहकांच्या वाढत्या मागणी बरोबरच संचालक किरण येज्जा यांनी आपल्या जवळील कारागीर आणि मशिन्सची संख्या वाढवत आधुनिकतेचा पुरस्कार केला. नुसतेच ड्रेस शिवून न देता ग्राहकांना मनपसंत असे कापड मिळावे म्हणून नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड कापडाचे वस्त्रदालन ग्राहकांच्या सेवेत रुजू केले. ग्राहकांनी फक्त कोणत्या प्रकारचा ड्रेस शिवायचा हे मनाशी पक्के करून B.Y.Tailors कडे प्रवेश केला की तुमच्या मनपसंत रंगसंगतीचा, ब्रँडेड ड्रेस तुम्हाला अगदी ठरल्या वेळेत शिवून मिळतो. किरण येज्जा यांनी आपल्या व्यवसायात पारंपारिक पध्दतीला दूर करीत संगणकीय प्रणालीचा अवलंब केला असल्याने ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत अधिक अचूकता आणि पारदर्शकता मिळत असल्याने ग्राहक समाधानी आहेत. B.Y.Tailors यांचे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नोकरदार ग्राहक वर्गाबरोबरच व्यापारी – उद्योजक, राजकीय नेतेमंडळी, सनदी अधिकारी, शिक्षक – प्राध्यापक, कारखानदार अश्या वर्गातून ग्राहक असल्याने फॅशन ट्रेण्ड हा तर आपसूकच तयार होतो.

मोदी जॅकेट बद्दल माहिती देताना संचालक किरण येज्जा यांच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने हायटेक प्रणालीचा वापर करीत देशभर आघाडी घेतली होती. तेंव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे भाजपा कडून पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून देशभर राजकीय प्रचार सभा गाजवत होते. भारतीय मतदारांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्या भाषण शैली बरोबरच त्यांच्या वेशभूषेचेही सर्वसामान्यांमध्ये आकर्षण वाढलेले होते. सोलापूरच्या प्रचार दौऱ्यात प्रयत्नाने भेट मिळवीत किरण येज्जा यांनी मोदींसाठी शिवलेले जॅकेट पोहोचविले. मोदी यांनी तात्काळ स्वीकार करीत सोलापूरच्या जाहीर सभेच्या कार्यक्रमात ते परिधान केले. या प्रसंगातूनच मोदी जॅकेटचा जन्म झाला.

देशाचे पंतप्रधान बनल्यावर देखील किरण येज्जा यांनी पाठवलेले जॅकेट परिधान करून नरेंद्र मोदी यांनी देश – विदेशात आपल्या सभा गाजविल्या. गेल्या आठ वर्षांपासून हा सिलसिला सुरू आहे. देशाबरोबर आता विदेशातही ‘ मोदी जॅकेट ‘ फॅशन ट्रेंड बनले आहे. पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्यासह देशातील प्रमुख नेतेमंडळीचे ड्रेस शिवणारे B.Y.Tailors चे संचालक किरण येज्जा यांच्या दृष्टीने ही स्वप्नपूर्तीचा आहे तर सोलापूरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

6

)

 1. balaji jamdade

  वा छान सर तुमचे आर्टिकल वाचून एक आमच्या ज्ञानात मध्ये भर पडते असेच तुम्ही लिहिता आणि आमच्या ज्ञानात भर पाडत रहा धन्यवाद सर

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद बालाजी.🙏🙏

   Liked by 1 person

   1. rituved

    खरच Quality आहे B.Y.Tailors मध्ये

    Liked by 1 person

 2. Vijay Pawar

  सोलापूर ला राजकीय वारसा म्हणून मोदींचं जॅकेट मुळे महती मिळाली

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   सोलापूरकर म्हणून नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. 🙏🙏

   Like

%d bloggers like this: