जगातील सर्वाधिक उंचीचे पुतळे कोणते ? असा प्रश्न विचारला तर पूर्वी न्यूयॉर्कच्या ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चे नाव घेतले जायचे..मात्र आता या श्रेयनामावलीत भारतातील दोन सर्वाधिक उंचीचे पुतळे आता पुढील काही दिवसात समारंभपूर्वक सामील होत आहेत. भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरणाऱ्या या सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यातून भारतीय संस्कृती आणि तिची महानता देखील जगाला आकर्षित करणारी आहे.

महान गणितज्ञ स्वामी रामानुजाचार्य.
जगातील सर्वाधिक उंचीचे पुतळे म्हणून आतापर्यंत स्टॅच्यु ऑफ युनिटी,गुजरात, भारत (१८२ मीटर), चीन मधील लुशान काउंटी हेनन येथील स्प्रिंग टेम्पल मधील बुद्धाची मूर्ती (१५३ मीटर), जपान मधील दाईउत्सु,उशिकू (१२० मीटर),यूएसए मधील न्यूयार्क येथील स्टॅच्यु ऑफ लिबर्टी (९३मीटर), रशिया मधील वोल्गोग्राड मधील ‘द मदरलँड कॉल्स'(८५ मीटर) तर ब्राझील मधील रियो दि जानेरिओ येथील क्राईस्ट द रिडीमर (३९.६ मीटर) या पुतळ्यांची गणना होत होती.

जगातील सर्वात मोठ्या उंचीच्या या आसनस्थ पुतळ्याला (सिटिंग स्टॅच्यु) बनवायला एकूण १०० कोटी खर्च आला आहे. एकूण चारशे एकर परिसरातील ४० एकर क्षेत्रावर मुख्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे एकूण १६०० पार्ट चीनवरून बनवून आणण्यात आले. ते जोडायला ९ महिन्यांचा कालावधी लागला. जगातील सर्वात मोठा ३०२ फूट उंचीचा ग्रेट बुद्धाचा पुतळा थायलंड मध्ये आहे. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाचा ग्रेट गणितज्ञ स्वामी रामानुजाचार्य यांचा बैठा पुतळा हैदराबाद येथून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरामनगर येथे स्थापित करण्यात आला आहे. याबरोबरच राजस्थानमधील नाथद्वार येथे ३५१ फूट उंचीची शिवमूर्ती तयार झाली आहे. मात्र तिचे अनावरण मार्च महिन्यात आहे. त्याअगोदर फेब्रुवारी महिन्यात स्वामी रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. म्हणजेच जगातील पहिले दोन सर्वात उंच पुतळे हे भारतात असणार आहे. भारतात पर्यटन वाढीसाठी निश्चितच याचा फायदा होईल.

ग्रेट गणितज्ञ स्वामी रामानुजाचार्य यांच्या या मूर्तीबरोबरच १०८ उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेली मंदिरे उभारण्यात आली आहेत. याबरोबरच १२० किलो सोन्याचा वापर करीत रामानुजाचार्यांची छोटी मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती दैनंदिन पूजा आर्चनेसाठी उपयोगात येणार आहे. या ४०० एकर परिसरातील भव्य मूर्तीला ‘स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी’ असे नाव देण्यात आले आहे. आत्तापर्यंत या प्रोजेक्टवर १४०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

वैष्णव संप्रदायाचे संत चिन्ना जियर स्वामी आणि श्री रामानुजा सहस्त्रब्दी प्रोजेक्टचे चीफ आर्किटेक्ट प्रसाद स्थापती यांनी मूर्ती बनविण्यासाठी अगोदर एक कमिटी स्थापन केली. मूर्ती कशी असावी ? याकरिता अगोदर १४ मातीच्या मूर्ती बनविण्यात आल्या. त्यानंतर सर्वानुमते त्यातून चार मुर्त्या निवडल्या. या चार मूर्तीमधील वैशिष्ट्य निवडून त्याची एक मूर्ती बनविण्यात आली. २०१४ मध्ये या नव्या मूर्तीचे पहिल्यांदा बेंगळुरू येथे थ्रीडी स्कॅनिंग करण्यात आले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक मॉडेल बनविण्यात आले. मग चीन मधील एरोसन कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर १४ ऑगस्ट २०१५ मध्ये मूर्ती बनवण्या बाबत करार करण्यात आला. मूर्ती बनविण्याच्या काळात समिती सदस्य दर १५ दिवसाला चीन दौऱ्यावर जात होते. एकूण १८०० वेला मूर्तिकामात बदल सुचविण्यात आले. १८ महिन्यानंतर मूर्ती तयार झाली. ६५० टन वजनाची ही मूर्ती आहे. मूर्तीमध्ये ८२ टक्के कॉपर याशिवाय झिंक, टिन, गोल्ड, सिल्व्हर धातूंचा समावेश आहे. भारतातील भव्य अश्या मंदिरांबरोबरच आता भव्य मूर्ती पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल हे मात्र नक्की.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा